Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

मराठी भाषा अस्मितेचा श्वास::जिल्हा वाहतूक अधिकारी सोळुंके

मराठी ही भाषाच नाही तर आपल्या अस्मितेचा श्वास आहे — वाहतूक अधिकारी सोळुंके

एसटी आगारात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
जिंतूर:: मराठी ही फक्त आपली बोली भाषाच नाही तर आपल्या अस्मितेचा श्वास आहे.असे मत वाहतूक अधिकारी सोळुंके यांनी व्यक्त केले.
ते जिंतूर एसटी आगारात आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या वतीने वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास वाहतूक अधिकारी सोळुंके, जिल्हा ग्राहक मंचाचे जिल्हा अध्यक्ष गुलाब शिंदें यांचे स्वागत करण्यात आले.
या  कार्यक्रमात जिल्हा वाहतूक अधिकारी सोळुंके सविस्तर  मार्गदर्शनपर आपल्या भाषणात आपली मराठी मायबोली भाषे बद्दल असे सांगितले की महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४’ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवीश्रेष्ठ श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला, तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी मातृभाषेचा वारसा पुढे चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वतपण टिकवावे या हेतूने जगभरात हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
तसेच त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना असेही सांगितले की आजचा दिवस म्हणजे मायबोलीच्या सन्मानाचा दिवस असून संस्कृतच्या प्रभावातून जन्मलेली प्राकृत बोलीभाषा म्हणजे मराठी सात वाहनाच्या पैठण दरवाज्यात घुमली. आणि मराठीचा पाया रचला गेला.
यादवांच्या राज आश्रयात फुललेली ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानातून प्रकटलेली नामदेव,तुकारामाच्या अभंगातून जागवलेली,भक्ती आणि समाज जागृती हीच मराठ्याची दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे. बहिणाबाईच्या ओव्या

पू.ल.देशपांडेच हास्य अण्णाभाऊ साठेची ज्वाला,फाळके यांचा पडदा आणि लतादीदीचे स्वर ,साहित्य कला आणि संस्कृती जपणारी हीच मराठी फुले,शाहू आंबेडकरांच्या विचारांनी उजळलेली, परिवर्तनाची मशाल आहे, सह्याद्रीचा कडावर कोरलेली,कोकणच्या लाटावर डोलणारी, गड किल्ल्यावर दिमाखाने उभी असणारी, पंढरपूरच्या वारीत निनादणारी, ही आपली मायबोली मराठी आहे.
संस्कृतीची अजरामर छाप सोडणारी मराठी भाषा ही फक्त भाषा नाही तर हा आपल्या अस्मितेचा श्वास आहे असे सोळुंके यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वाहतूक अधिकारी सोळुंके हे होते तसेच जिल्हा ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिपिक गजानन घुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद चव्हाण यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास वा जिल्हा वाहतूक अधिकारी सोळुंके, आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण, जिल्हा ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, वाहतूक निरीक्षक शरद पाटील, लिपिक राहुल लिखे,गजानन गीते,गुणीरत्न वाकोडे पत्रकार बांधव तसेच प्रवासी मित्र व नागरिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!