कौसडीत भयंकर गोवंश हत्येने मोठी खळबळ

कौसडीत भयंकर गोवंश हत्येने मोठी खळबळ
पोलिसाच्या छाप्यात एक जिवंत गाय एक जिवंत बैल व तब्बल 11 बैलाचे कापलेले मुंडके आढळले
पोलिसांच्या छाप्यात 7.45 लाखांचा मुद्देमाल जप्त
बोरी पोलिसांची धडक कार्यवाही
तब्बल 11 बैलांची कत्तल उघडकीस;
जिवंत जनावरे, वाहन व धारदार शस्त्रांसह दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
जिंतूर::तालुक्यातील कौसडी येथे गोवंश हत्येची माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून 7 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अब्दुल रहेमान अब्दुल करीम कुरेशी व त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसडी बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहितीदारामार्फत संबंधित व्यक्ती त्यांच्या राहत्या घरी गोवंश हत्या करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने पंचांच्या उपस्थितीत दुपारी सुमारे 12.30 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात एक जिवंत गाय, एक जिवंत बैल,11 बैलांचे कापलेले मुंडके, कातडी, शेपटे व खुर, गोवंश वाहतुकीसाठी वापरले जाणारे टाटा छोटा हत्ती वाहन तसेच पाच सु-या व दोन कुऱ्हाडी असा एकूण 7.45 लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
यावेळी संशयितांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रहेमान कुरेशी याच्यावर यापूर्वीही बैल चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून ते प्रकरण परभणी जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणात चोरी केलेल्या बैलांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी पाठविल्याचा आरोप होता. त्यामुळे सद्य कारवाईमुळे पुन्हा एकदा संबंधित आरोपी चर्चेत आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश जटाळ यांनी केली. कारवाईसाठी हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ कोकाटे, पोलीस शिपाई प्रकाश मोरे, संघसेन कांबळे आणि गजेंद्र धरणे यांनी सहकार्य केले




