Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

अखेर पालकमंत्री ठरल्या खऱ्या BOSS!!!

प्रथमच परभणी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा::पण अध्यक्ष लता वाकळे की भरत घनदाट सस्पेन्स कायम

परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच पण लता वाकळे की भरत घनदाट

@ पालकमंत्री बाजी मारणार का महाविकास आघाडी चाल खेळणार

@भाजप प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी नावाची केली नाही घोषणा::सस्पेन्स कायम

@महाविकास आघाडी कडून शिंदे गटाच्या पूजा सावंत चमत्कार घडविनार का

@ आज जिल्हा परिषद पदाचा सस्पेन्स दुपार नंतर स्पष्ट होणार

परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी लता वाकळे, उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर यांची निवड निश्चिततेकडे
परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या लता विजय वाकळे यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची बहुमताने निवड होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महायुतीतील पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर या दोन्ही पदांबाबतची अनिश्चितता आता जवळपास संपुष्टात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष बैठक आज बुधवार, दि. 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव राहणार आहेत. नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
यंदा अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने सावंगी (ता. जिंतूर) गटातील भाजपच्या लता वाकळे यांचे नाव पुढे आले आहे. तर उपाध्यक्षपदासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी मुंबई येथे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीत एकजूट दाखवणार असल्याचे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सर्व सदस्यांनी मतदानावेळी एकमुखी पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
असे जरी जगजाहीर झालेले असले तरी आजघडीच्या राजकीय रणांगणात मिनी मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषद परभणीच्या अध्यक्ष पदाच्या खुर्ची वर भाजप जरी जिल्ह्यात एकूण 54 जागा पैकी 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून अध्यक्ष पदाचा नैसर्गिक हक्कदार आहे. कारण सत्ते साठी केवळ चार जागा भाजपला हव्या आहेत.बहुमत असले तरी भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी या पुर्वी बरेचसे खलबत्ते आणि गुप्त बैठका पार पडलेल्या आहेत.महायूतीतील महत्वाचा घटक राष्ट्रवादी (अजित दादा गट) दादागिरी करणार का अशी शंका सुद्धा आहे. कारण या गटाचे प्रमुख आमदार राजेश विटेकर व माजी आमदार विजय भांबळे यांचे जिल्ह्यात भाजप सोबत संबध मधुर नाहीत.जिल्ह्यातील हे महायुतीतील दोन्ही पक्ष प्रत्येक निवडणुकीत एकमेका विरोधात दंड थोपटून उभे होते.शिंदे गट प्रमुख आनंद भरोसे भाजप सोबत संतुष्ट आहेच असे नाही.हे परभणी महानगर पालिकेच्या निवडणुकीत चित्र समोर आहे. भाजपने या महानगर पालिका निवडणुकीत युती साठी शिंदे गटास अपेक्षित भाव दिला नव्हता.ही सल शिंदे गटाच्या मनात आहे.आणि पंरमपरागत विरोधी उध्दव सेनेचे खा. बंडू बॉस ही सर्व संधी हेरून आहेतच.मागील कालावधीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी उद्धव सेना, अजितपवार गट,शिंदे गट,काँग्रेस पक्ष आदी सर्व मिळून जिल्हा परिषद अध्यक्ष पद ताब्यात घेण्यासाठी बैठका घेत,बहुमताच्या आकड्यांची गणिते ठाण्यात एकत्र येऊन जुळवत होती.अशीही चर्चा जोर धरत होती.
शिंदे गटाकडे अध्यक्ष पद देण्याचे ठरले अशा गुप्त बातम्या बाहेर पडत होत्या.शिंदे गटाच्या पिंगळी गटातील पूजा सावंत यांना अध्यक्ष पद करण्याबाबत अनैसर्गिक सुर आवळला सुद्धा गेला. कारण राष्ट्रवादी कडे 15 जागा,ठाकरे गटा कडे 6 जागा,काँग्रेस दोन जागा,एक अपक्ष,असे एकूण 54 पैकी 24 जागा झालेल्या होत्या. सत्ते साठी पुन्हा चार जागेची मदत पाच सदस्य असलेला शिंदे गट महत्वाची भूमिका गाजविणार होता.असे सूर ज्या वेळी आवळले गेले आणि हे जिल्ह्यात वारे ज्या वेळी जोरदार पने वाहू लागले.त्या नंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर ह्या खऱ्या ॲक्शनमूडवर येत ही जिल्ह्यातील सत्ते साठी अनैसर्गिक शिजत असलेली खिचडी बाबत पक्ष श्रेष्टीच्या विशेषतः मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या कानी घातल्या नंतर शेवटच्या टप्प्यात काल प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करावे लागले की परभणीत भाजपला अध्यक्ष पद व राष्ट्रवादी अजित पवार यांना उपाध्यक्ष पद देणार असून महायुतीतील शिंदे गटास अन्य पदे भेटतील.
भाजपला अध्यक्ष पद भेटणार पण ही संधी जिंतूर कडे राहणार की गंगाखेडला हेही सस्पेन्स आहे.कारण प्रदेश अध्यक्ष माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी स्पष्ट नावाचा उल्लेख केला नाही.
आणि या सर्व प्रक्रियेवर पडदा जरी पडला तरी कोणाच्या मनात काय खदखद आहे.हे दुपार नंतर सस्पेन्स दूर होणार
=======================
दरम्यान, 2022 मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर काही काळ प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्या. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून आता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होत आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 तसेच संबंधित नियम 1962 मधील तरतुदीनुसार ही निवड प्रक्रिया पार पडणार असून, या निवडीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
======================
आज दुपार नंतर कळणार भाजपच्या लता वाकळे की भरत घनदाट की भाजपला सत्ते पासून दूर ठेवण्याचे दिव्य स्वप्न पाहणाऱ्या सर्व फुटीर एकत्र गटाच्या पूजा सावंत परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होणार……….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!