Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

112 वर खोटी माहिती देणाऱ्या भामट्यास अखेर पोलिसांनी शोधले

112 वर खोटी माहिती देणाऱ्या भामट्यास अखेर पोलिसांनी शोधले

पोलिसांची केलेली दिशाभूल भोवली::आरोपीवर गुन्हा दाखल

जिंतूर ::: कोणतीही मारामारीची घटना झालेली नसताना मुद्दाम पोलीस प्रशासनाला दिशाभूल करणाऱ्या व 112 वर चुकीची माहिती दिल्या बद्दल एका भामट्याच्या विरोधात अखेर पोलिसांनी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक 20 मार्च रोजी 8:20 वाजे दरम्यान डायल 112 वर ड्युटीवर असताना 17:45 वाजता कॉलर शिवाजी मुक्ताजी मारकड वय 35 वर्ष राहणार मोहाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी आपल्या मोबाईल वरून शासकीय तक्रार सुविधा डायल क्रमांक 112 वर मला मारहाण झाल्याची कोणती घटना घडलेली नसताना पोलिसांना त्रास होईल या हेतूने कॉल करून खोटी माहिती दिली. व स्वतःचा मोबाईल नंबर बंद ठेवला.
सदर कॉलर यांचा शोध घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घटनेबाबत माहिती विचारली असता त्यांनी अशी काही घटना घडली नसल्याचे सांगून उडवा-उडीची उत्तरे देऊन मी डायल 112 ला खोटा कॉल केल्याचे मान्य केले. असे सिद्ध झाल्यानंतर सरकार तर्फे फिर्यादी पोशी महादेव शिवाजी गव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन जिंतूर येथे अदखलपात्रक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या व सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी
जीवन देवाशिष बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे पोलीस स्टेशन जिंतूर व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुंगाणे, पोह.राठोड,गजभार, पोशी गव्हाणे यांनी केली आहे.
चौकट
नमूद डायल 112 हा क्रमांक गरजू लोकांपर्यंत पोलीस मदत तत्काळ भेटावी याकरता आहे. कोणीही पोलिसांना त्रास होईल यादृष्टीने डायल 112 ला कॉल करून खोटी माहिती दिली तर त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!