आगामी गाळप विक्रमी करण्याचा मानस:: चेअरमन भावनाताई मुंगसे पाटील

विक्रमी गाळप साध्य करण्याचा मानस —– चेअरमन भावनाताई मुंगसे
@ टोकाईच्या सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा
जिंतूर —- टोकाइ सहकारी साखर कारखान्याचे आगामी गळीत हंगामाचे उदिष्ट विक्रमी करण्याचा मानस चेअरमन भावना ताई मुंगसे यांनी व्यक्त केला.
भावनाताई मुंगसे यांच्या भक्कम नेतृत्वात श्री तुळजाभवानी शूगर प्रा. ली.सहयोगी तत्वावर चालवत असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या ऊस बिलाची रक्कम खात्यावर जमा केली.
असून सर्व
सुजान शेतकरी,सभासद सन्माननीय संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून पुढील गाळप हंगामात पूर्वीपेक्षा विक्रमी गाळप साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत भावनाताई मुंगसे यांनी व्यक्त केले.
कारखाना हे एक आपले घर असून उत्पादक सभासद, संचालक कर्मचारी तसेच ऊस वाहतूकदार हे सर्व कारखान्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. सहकारी तत्त्वावर कोणताही व्यवसाय हा चालवत असताना एकमेकांना साथ देणे व एकमेकांना विश्वासात घेऊन पुढे वाटचाल करणे ही तत्त्वे पाळणे फार मोलाची असतात”बिना सहकार नही उद्धार” या म्हणीप्रमाणे एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना सहकार्य करून आपण निरंतर आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवू शकतो.
पण दुर्दैवाने काही सन्माननीय संचालक बांधव ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले याचे अतिव दुःख झाल्याचे मत व्यक्त करत या बद्दल तीव्र नाराजी भावनाताई मुंगसे यांनी यावेळी व्यक्त केली.
कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकरी हा कणा असतो. शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन करूनच पुढील यशस्वी वाटचाल करावी लागते. ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या विश्वासाने कारखान्यावर ऊस आणतो व आपलं भविष्य ठरवतो पण काही संचालक मंडळ त्यांची दिशाभूल करत असल्याने निदर्शनास आलेले आहे.तेव्हा अशा कोणत्याही अफवेवर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी विश्वास ठेवू नये.अशी भावना भावना ताई मुंगसे यांनी व्यक्त केली.



