घंटानाद आंदोलनाने परिसर दुमदुमला
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी संघटना आक्रमक

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी घंटानांद आंदोलन संपन्न
जिंतूर::: एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा घंटानाद आंदोलन करून एसटी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेतले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की सबंध महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत असून या मागण्या शासनाने त्वरित मागणी कराव्या म्हणून एसटी संघटनेच्या विविध संघटनांनी तीन टप्प्यात आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांना एका निवेदनाद्वारे निवेदन देऊन इशारा दिला होता.
आपल्या विविध मागण्यात 2017 पासून वर्ग दोन कनिष्ठ वेतन लागू करा, एसटीचे अस्तित्व टिकण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करा, मध्यवर्ती कार्यशाळेत नवीन बस बांधणीसाठी चैसिसचा पुरवठा करून स्वमालकीच्या बस बांधणी करा, जन सुरक्षा अधिनियम 2024 राज्यात लागू करा,महागाई भत्ता एक रकमी तातडीने अदा कर, घर भाड्याचा दर दहा टक्के, वीस टक्के, तीस टक्के करून एक तर्फी अदा करा, 2016 पासून एकतर्फी कमी करण्यात आलेला वेतन वाढीचा दर तातडीने तीन टक्के करून निश्चित करा, एसटी कामगाराचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे समान करा, तसेच राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन,भाडे भत्ते व सेवा सुविधा तात्काळ लागू करा आदी प्रलंबित मागण्यासाठी पुढील आंदोलनाचा एल्गार करण्यात आला आहे.
15 जुन रोजी घंटा आंदोलन आज एसटी आगारात मोठ्या प्रमाणात संपन्न झाले. यात बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी आपल्या हातात विविध मागण्याचे फलक दर्शवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आज जिंतूर आगारात संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित घंटा नाद आंदोलनात सहभागी कर्मचारी
कामगार संघटना अध्यक्ष उत्तम तळेकर, सचिव अनिल घुगे
इंटक काँग्रेस अध्यक्ष,श्रीनिवास देशमुख सचिव पिंगळे ज्ञानेश्वर सेना अध्यक्ष रमेश आढे,सचिव सुनील घुगे,कास्ट्राईब अध्यक्ष कमलाकर कणकुटे,सचिव तथागत कांबळे व आगारातील लेखा अधिकारी ज्ञानेश्वर पांचाळ कर्मचारी कल्याणराव देशमुख,विठ्ठलराव आढे,संदीप भांबळे,राहुल लिखे,दिगंबर रनबावळे,विजय शेळके,दीपक चिलगर, विलास काठमोरे, सुनील खिल्लारे,
विष्णु राठोड,पुष्कल देशमुख, लाखाडे,मदन मुंढे,कुकडे ,रोहिदास गीते,मुखिद पठाण,ललिता देशमुख गुलाब राठोड,गजानन गीते व इतर बहुसंख कर्मचारी हजर होते.



