Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या:कोक्रोज पार्टीच्या आंदोलकावर झालेल्या अमानुष लाटीहल्ला करणाऱ्या पोलिसावर गुन्हे दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी

वंचित आघाडीच्या आंदोलनास काँग्रेस सह उबाठा शिवसेनेचाही पाठिंबा

केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घ्या:: व कॉक्रोज पार्टीच्या आंदोलन कर्त्यावरील लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा:: वंचित बहुजन आघाडीची मागणी

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनास काँग्रेस सह उबाठा शिवसेनेची साथ

जिंतूर::धर्मेंद्र प्रधान, केंद्रिय शिक्षण मंत्री, भारत सरकार यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्ली जंतरमंतर येथे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण
करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा व दिल्ली येथे शांततापूर्ण व लोकशाही
मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि बळाचा वापर हा अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. लोकशाहीमध्ये आपल्या न्याय मागण्या मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला भारतीय
संविधानाने दिला आहे. अशा शांततापूर्ण आंदोलनांना दडपण्यासाठी शासनाकडून बळाचा वापर करणे ही
लोकशाहीच्या मूल्यांवर झालेली गंभीर गदा आहे. या घटनेचा वंचित बहुजन आघाडी, जिंतूर तालुक्याच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल्याचे नमूद करून या निषेधार्थ मा. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दि. २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडी, जिंतूरचा संपूर्ण पाठिंबा देत तालुका प्रशासनास निवेदन सादर केले.वरील मागण्याची तात्काळ दखल घेऊन कारवाई अशीही मागणी केली.
निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या मांडन्यात आल्या धर्मेंद्र प्रधान, (केंद्रीय शिक्षण मंत्री) यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा.
दिल्ली जंतरमंतर येथे आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाण व लाठीमार करणाऱ्या
पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,Neet चा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी भारतभर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील जे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ वापस घेण्यात यावे.आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार जिंतूर यांना देण्यात
आले.निवेदनावर भिक्खू
संघरत्न,भिक्खू महानाम,शरद चव्हाण,सतीष वाकळे,(युवा जिल्हा महासचिव,वंचित बहुजन आघाडी),गणेश काकडे,विकास अण्णा मोरे,भारत घनसावध,राम भिसे,बबन वाकळे,राम खंडागळे,नागेश आकात,पवन वाकळे,बबन ठोके,रमेश ठोके,विनोद खंदारे,भारत सूर्यवंशी या सह असंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेक शेख इस्माईल पहेलवान व काँग्रेसचे शहर अध्यक्ष फिरोज भाई उबाठा शिवसेनेचे गंगाप्रसाद घुगे यांचीही यांचीही उपस्थिती होती.
तहसीलदार कछवे मॅडम यांना आंदोलन कार्यानी निवेदन दिल्या नंतर काँग्रेसचे शेख इस्माईल पहेलवान,विकास अण्णा मोरे,फिरोज भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!