जिल्हा परिषद,पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य निवडले जाणार

जि.प.प.स मध्येही स्वीकृत सदस्य निवडले जाणार::
मंत्र्यालयात शिक्कामोर्तब
किमान पाच सदस्य निवडले जाणार
जिंतूर::::आज राज्याच्या मंत्रालयात आज आवश्यक कायदा पास झाला. आता नगरपालिका महानगरपालिका प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वीकारत सदस्य निवडले जाणार.
याविषयी सविस्तर माहिती अशी की आज झालेल्या मंत्रालय निर्णयात नगरपालिका महानगरपालिका प्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य निवडले जाणार.
जास्तीत जास्त पाच सदस्य निवडले जाणार यामध्ये जिल्हा परिषद मधील एकूण जागेच्या 10 टक्के व पंचायत समितीच्या एकूण जागेचा 20 टक्के असे स्वीकृत सदस्य आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रवेश करणार आहेत.
या निर्णयामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कर्तव्यनिष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी यांना न्याय भेटणार आहे.
आज झालेल्या या निर्णया मुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे.



