एसटी संघटनेचे प्रलंबित मागण्या साठी तीन टप्प्यात आंदोलनाचा एल्गार

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रललंबित मागण्यासाठी घंटानांद आंदोलन
तीन टप्प्यात होणार आंदोलन
जिंतूर::: एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती एसटी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की सबंध महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत असून या मागण्या शासनाने त्वरित मागणी कराव्या म्हणून एसटी संघटनेच्या विविध संघटनांनी तीन टप्प्यात आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन जिंतूर आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांना एका निवेदनाद्वारे निवेदन देऊन इशारा दिला आहे.
आपल्या विविध मागण्यात 2017 पासून वर्ग दोन कनिष्ठ वेतन लागू करा, एसटीचे अस्तित्व टिकण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करा, मध्यवर्ती कार्यशाळेत नवीन बस बांधणीसाठी चैसिसचा पुरवठा करून स्वमालकीच्या बस बांधणी करा, जन सुरक्षा अधिनियम 2024 राज्यात लागू करा,महागाई भत्ता एक रकमी तातडीने अदा कर, घर भाड्याचा दर दहा टक्के, वीस टक्के, तीस टक्के करून एक तर्फी अदा करा, 2016 पासून एकतर्फी कमी करण्यात आलेला वेतन वाढीचा दर तातडीने तीन टक्के करून निश्चित करा, एसटी कामगाराचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे समान करा, तसेच राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन,भाडे भत्ते व सेवा सुविधा तात्काळ लागू करा आदी प्रलंबित मागण्यासाठी पुढील आंदोलनाचा एल्गार करण्यात आला आहे.
15 जुन रोजी घंटा नांदोलन दुसऱ्या टप्प्यात 22 जून रोजी द्वार सभा तर 29 जून रोजी धरणे आंदोलन छेडले जाणारा असल्याची माहिती कामगार संघटना अध्यक्ष तळेकर, सचिव अनिल घुगे, तर काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास देशमुख, सचिव ज्ञानेश्वर पिंगळे, व कामगार सेना अध्यक्ष रमेश साडे,सचिव सुनील घुगे , तर कास्ट्राईब तालुकाध्यक्ष कमलाकर कनकुटे, सचिव तथागत कांबळे आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी मदन मुंडे, संदीप भांबळे, दिगंबर रणबावळे, राहुल लिखे, आदींची उपस्थिती होती.




