Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

“नो पार्किंग झोनची” कार्यवाही दुसऱ्या टप्प्यातही राबवणार::सुरक्षा दक्षता अधिकारी काळबांडे

एसटीच्या 200 मी.आवारातील अवैध वाहतुकीवर कडक कार्यवाही होणार

अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात एसटीची धडक मोहीम राबवणार – सुरक्षा दक्षता अधिकारी काळबांडे

दुसऱ्या टप्प्यात नो पार्किंग झोनची कार्यवाही 10 जुलै पर्यत राहणार

जिंतूर:: प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..या मोहिमे अंतर्गत सर्व प्रमुख बसस्थानकांच्या परिसरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार असून बसस्थानकापासून 200 मीटरपर्यंतचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही मोहीम 01 जुलै  ते 10 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक तसेच एसटी परिसरात थांबून प्रवासी स्थानिक प्रशासनाला सहकार्याच्या
नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात
महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. नारनवरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांद्वारे होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलात मोठी घट झाली आहे. तसेच अशा वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या मोहिमे दरम्यान बसस्थानकांच्या २०० मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात विभागातील अधिकारी, पर्यवेक्षक, आगार प्रशासन आणि स्थानिक पोलीस परभणी विभागातील जिंतूर, परभणी, सेलू,पाथरी, यांचे संयुक्त पथक कारवाई करणार मानवत, वसमत, असून, अवैध प्रवासी वाहतुकीवर हिंगोली, कळमनुरी प्रभावी नियंत्रण मिळविण्याचा आदी प्रमुख प्रयत्न केला जाणार आहे. बसस्थानकांच्या परिसरातही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.बसस्थानकाबाहेरप्रवासी गोळा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून,अशा वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. परभणी विभागाचे सुरक्षा वदक्षता अधिकारी काळबांडे.यांच्या एसटी प्रशासनाने प्रवाशांनाही आवाहन केले असून, अधिकृत एसटी सेवेलाच प्राधान्य द्यावे आणि सुरक्षित प्रवासासाठी.अनधिकृत वाहनांचा वापर टाळावा,असे सांगितले आहे.या विशेष मोहिमेमुळे
बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल,अशी अपेक्षा व्यक्त
केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!