प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड आता अनिवार्य::आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण
जिंतूरच्या बसस्थानकात एनसीएमसी स्मार्ट कार्डचे उद्घाटन

प्रवासा दरम्यान NCMC कार्ड आता अनिवार्य—आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण
जिंतूरच्या बस स्थानकात NCMC स्मार्ट कार्डचे उद्घाटन
जिंतूर ::प्रवाशांच्या सोयीसाठी व डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी जिंतूर बसस्थानकात NCMC स्मार्ट कार्डचे उद्घाटन आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण 
प्रवासी महासंघाचे सचिन रायपत्रीवार व प्रमुख पाहुणे दिव्यांग तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ थिटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या NCMC स्मार्ट कार्ड जेष्ठ नागरिक, महिला, अमृत जेष्ठ नागरिक, दृष्टीहीन, दिव्यांग, विद्यार्थी यांना हे कार्ड अनिवार्य करण्यात येईल, वेगवान सुरक्षित, स्मार्ट कार्ड पेमेंट द्वारे प्रवास सुलभ, सुरक्षित व पारदर्शक होईल, याचा सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी. आज उद्घाटन प्रसंगी सहाय्यक वाहतूक अधीक्षक रामेश्वर सोनवणे, प्रल्हाद मुंडे, वरिष्ठ लिपिक गजानन घुगे, वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव सखाराम गुहाडे, एजंट गजानन घनवटे, वाहतूक नियंत्रक हे सर्व कर्मचारी हजर होते.




