Uncategorized

पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत कसर येथे बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक संपन्न

पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांच्या उपस्थितीत कसर येथे बीबीएफ (BBF) तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक संपन्न!

जिंतू:जिंतूर तालुक्यातील मौजे कसर येथे कृषी विभागाच्या वतीने बीबीएफ (Broad Bed Furrow – रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीन लागवड प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रमुख उपस्थिती लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि स्वतः शेतात जाऊन या आधुनिक पेरणी पद्धतीची पाहणी केली. हवामानातील अनिश्चिततेच्या काळात पिकांचे नुकसान
टाळण्यासाठी आणि सोयाबीन उत्पादनात वाढ करण्यासाठी ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होतो आणि कमी पाऊस पडल्यास जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी केले. तसेच
तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती: या प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने:किशोर खिस्ते,अभिजीत पारवे, माधव दराडे, आत्माराम पवार, विठ्ठल शिंदे सरपंच कसर, नितीन घुगे (तालुका कृषी अधिकारी) सुनील कदम (मंडळ कृषी अधिकारी) स्वप्निल देशमुख (सहाय्यक कृषी अधिकारी)
गजानन घुगे (सहाय्यक कृषी अधिकारी) यांच्यासह कृषी विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री. नितीन घुगे यांनी बीबीएफ यंत्राची कार्यपद्धती आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी मौजे कसर आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!