Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

जिंतूर आगारात एसटीचा 78वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिंतूर एसटी आगारात एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिंतूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिंतूर एसटी आगारात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आगार परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला असून कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.वर्धापन दिनानिमित्त आगार प्रशासनाच्या वतीने प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रवाशांना पेढे वाटप करून एसटीच्या गौरवशाली प्रवासाचा आनंद साजरा करण्यात आला. प्रवाशांनीही या उपक्रमाचे स्वागत करत एसटी महामंडळाच्या सेवेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी आगार परिसरात फुलांच्या सजावटीसह रंगीबेरंगी रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती. आगार परिसर स्वच्छ करण्यात आला.
रांगोळ्यांमधून एसटीच्या ७८ वर्षांच्या सेवेला मानवंदना देण्यात आली. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असल्याचे सांगत प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण व शहरी भागांना जोडणाऱ्या एसटी महामंडळाने राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असून,भविष्यातही ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जागतिक व देशपातळीवरील इंधनाची टंचाई व भाव वाढ लक्षात घेता लक्षात घेता सुजाण प्रवाशी वर्गाने असुरक्षित असणाऱ्या खाजगी वाहनाच्या तुलनेत सुरक्षित सेवा देणाऱ्या व विविध सवलती असणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवास करण्याचे आव्हान आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी वर्धापन दिनानिमित्त उपस्थित प्रवाशी वर्गांना आवाहन केले.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे वाहतूक निरीक्षक शरद पाटील आगार लेखाकर ज्ञानेश्वर पांचाळ, प्रमुख कारागीर सुनील पंडित,वरिष्ठ लिपिक,प्रल्हाद मुंडे,राहुल लिखें लिपिक गजानन घुगे,गजानन गीते, गुणीरत्न वाकोडे,शिल्पा टारफे, प्रवासी मित्र सचिन रायपत्रीवार तसेच महेश देशमुख, सुरक्षारक्षक समी पठाण,सुनील घुगे,चालक अतुल घोडके,वाहक शंकर भाग्यवंत

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

25 वर्ष सुरक्षित सेवा घेणाऱ्या चालकांचा केला विशेष गौरव

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
चालक सेवेच्या पंचवीस वर्ष किंवा जास्त सेवा बजावलेल्या चालकात सुरेश नारायण दुधाळकर चा. क्र. ३६५३, भारत रामभाउ डाके चा. क. ९९८७, गुलाब हेमा राठोड चा. क. ९९५८,शेख अकबर शेख युसूफ चा. क. ९८६४, शेख बाबुलाल शेख हूसेन चा. क. ९४३४ या सह
सेवानिवृत्त झालेले चालक मंजा सखाराम पांचाळ चा.क. १८९३५,व विठठल विश्वनाथ जमगुंडे चा. क. ९९०४ सुरक्षित सेवा बजावणाऱ्या या चालकांचा विशेष सत्कार करून गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!