शिक्षक किशन पुंड यांचा मुंबई येथे गौरवपूर्ण सत्कार

शिक्षक किसनराव पुंड यांचा मुंबई येथे गौरवपूर्ण सत्कार
एकता सेवाभावी संस्थेचा सामाजिक उपक्रम
संस्थेतर्फे दरवर्षी गुणवंताचा केला जातो सत्कार
मुबई::एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने विजाभज आश्रमशाळा संघटना, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा आश्रमशाळा क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक मा. किसनराव पुंड सर यांचा मुंबई येथे विशेष सत्कार करण्यात आला.
आश्रमशाळांमधील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या
विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि कल्याणकारी प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपल्या
कार्यकाळात त्यांनी आश्रमशाळांच्या विकासासाठी, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुंड सर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वगुणांचे,प्रामाणिकपणाचे व समाजहिताच्या बांधिलकीचे कौतुक केले. आश्रमशाळा क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना मा. किसनराव पुंड सर यांनी
हा सन्मान वैयक्तिक नसून आश्रमशाळा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, कर्मचारी व सहकाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही शिक्षण,
समाजसेवा आणि संघटनात्मक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिक्षक किशन पुंड यांनी शिक्षण दानाचे पवित्र कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत आश्रम शाळेचे प्रश्न शासन दरबारी जोमाने वेळोवेळी मांडून राज्यातील आश्रम शाळाचे शिक्षक, कर्मचारी यांचे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मंत्रालय स्तरावर केलेले कार्याची दखल घेत एकता सेवाभावी संघटनेने केलेल्या सत्कारा बद्दल किशन पुंड यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे

या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कर्मचारी,समाजसेवक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




