Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

सार्वजनिक जयंती तर्फे 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी

11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान सांस्कृतिक व व्याख्यानाचा कार्यक्रम

जिंतूर:: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान विविध सांस्कृतिक व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 11 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीम गीत कव्वाल गायक रुक्मान ताज आणि संच अकोला यांचा भीम गीताचा जल्लोष कार्यक्रम या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी आमदार विजयराव भांबळे तर उद्घाटक म्हणून सुरेश भैया नागरे यांची उपस्थिती असून स्वागताध्यक्ष रामराव उबाळे लक्ष्मणराव बुधवंत,केशवराव बुधवंत, हे राहणार आहेत.
तर 12 एप्रिल रोजी आंबेडकर सांस्कृतिक चळवतील युवा गायिका निकिता बंड आणि टीम स्वरांजली यांचा भीम गीताचा समाज प्रबोधन पर दणदणीत कार्यक्रम होणारा असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाजानी खा साब तर उद्घाटक म्हणून सिद्धार्थ हत्तीहंबीरे तर स्वागताध्यक्ष शेख इस्माईल सलीम पैलवान,नागसेन भेरजे यांची उपस्थिती राहणार आहे.13 एप्रिल रोजी राष्ट्रीय प्रबोधनकार व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विशाल कुमार आणि संच मुंबई यांचा समाज प्रबोधन पर भीम गीताचा
बहादार कार्यक्रम असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पालकमंत्री मेघना बोर्डीकर तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे सह सभापती गंगाधर बोर्डीकर, नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख तर स्वागत अध्यक्ष म्हणून सुरेश भुमरे,सचिन गोरे गोविंद थिटे, यांची उपस्थिती लाभणार आहे.
वरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी आयोजित केले आहे.
तर 14 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉ. प्रवीण कनकुटे यांचे आजचे लोकशाही व अनुयायांची जबाबदारी या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव जाधव तर कार्यक्रमाचे उद्घाटक आनंदराव भरोसे स्वागता अध्यक्ष म्हणून गणेश काजळे पाटील व माजी आमदार हरिभाऊ लहाने काका यांचे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तहसीलदार शितल कच्छवे, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य गिरीश कानडे,पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आ
बासाहेब जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय मस्के,गट शिक्षणाधिकारी पोले, आदींची उपस्थित राहणार आहेत. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे. अशी माहिती सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे उपाध्यक्ष कर्मवीर घनसावद सचिव बलवान वाकळे, कोषाध्यक्ष लखन खिल्लारे,कार्याध्यक्ष गणेश काकडे आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!