Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जि.प.सदस्य एक शाळा दत्तक घेणार

जिल्ह्यातील 54 जिल्हा परिषद शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास साधणार:: जि.प.सदस्य मनीषा अभिजीत पारवे यांची स्पष्टोक्ती

जि.प.शाळांच्या विकासासाठी ” पालकमंत्री SHRI ” अंतर्गत
जिल्ह्यातील 54 जिल्हा परिषद शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास
साधणार – जि. प. सदस्य मनीषा अभिजित पारवे

परभणी::परभणी जिल्हा परिषद अंतर्गत,जिल्हा परिषद परभणी, येथे जिल्हा परिषद अध्यक्षा ,लता वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा सम्पन्न झाली.

या बैठकीमध्ये, जिल्हा परिषद शाळांच्या समस्या मांडताना, जि. प. सदस्य मनीषा अभिजित
पारवे यांनी, “जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण यांच्यासमोर आज रोजी अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत.जिल्हा परिषद
शाळांमधील शिक्षण आज रोजी डळमळीत होताना दिसत आहे. झपाट्याने कमी होत जाणारी पटसंख्या, पालकांचा उडालेला विश्वास, पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे असणारा ओढा, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, शिक्षकांच्या रिक्त जागा,जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांचा अभाव, शिक्षकांना असणारे शाळाबाह्य अशैक्षणिक कामे,शिक्षकांचे डेपोटेशन, यांसारख्या अनेक समस्या आज रोजी प्राथमिक शिक्षणाच्या समोर
आ वासून उभ्या आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही.
या सर्व समस्या कुणी निर्माण केल्या, याला जबाबाबदार कोण ?, शिक्षक, पालक,अधिकारी, प्रशासन की अन्य कोणी, याच्या खोलात आपणाला जायचे नाही.परंतु परत
एकदा जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण यावरील पालकांचा विश्वास वाढून, गावामधील अंगणवाडीतील सर्व मुले जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले
पाहिजेत आणि दाखल झालेले मुल जिल्हा परिषद शाळेतील असणाऱ्या शेवटच्या इयत्तेपर्यंत टिकले पाहिजे यावर आपणाला आता काम करावे लागेल.आपल्या जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळा अतिशय सुंदर काम करत आहेत. मानवतच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची पटसंख्या १३०० पेक्षा जास्त आहे.तसेच पाथरीच्या जिल्हा परिषद माळीवाडा शाळेची पटसंख्या 1150 पेक्षा जास्त
आहे.ही आपल्या साठी गौरवाची बाब आहे. परंतु आजही जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा उदासीन आहेत. दूधगांव आणि वस्सा या जिल्हा परिषद शाळा आज रोजी 0(शून्य) पटसंख्येच्या अभावी बंद झालेल्या आहेत, या गावांची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त असतानाही, या शाळा बंद आहेत, ही जिल्हा परिषद प्रशासन म्हणून आपल्यासाठी अत्यन्त दुर्दैवी बाब आहे.अशी खंत व्यक्त  .
केली. बोलताना त्यांनी सांगितले, आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा भौतिक व गुणवत्तापूर्ण विकास होण्यासाठी मा. पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या
संकल्पनेतून, प्रत्येक जिल्हा परिषद गटातील एक जिल्हा परिषद शाळा, तेथील जिल्हा परिषद सदस्य हे दत्तक घेतील, व शाळेचा भौतिक व गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी
‘पालकमंत्री SHRI ‘ अंतर्गत या शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच प्रत्येक शाळेमध्ये, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पिंक रूम तयार करण्यात येईल, अशी माहिती मनीषा पारवे यांनी दिली. बैठकीसाठी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, ऍड. श्रीकांत विटेकर, शिक्षण व आरोग्य सभापती, वैशालीताई आंबेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख, सर्व सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सभापती,यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!