Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

अवैध वाहनावर सुरक्षा दक्षता पथकाचा दणका:260 वाहनावर कार्यवाही

एसटी आगाराच्या नो पार्किंग झोनचे उल्लंघन वाहनावर कार्यवाही

परिवहन विभागाच्या सुरक्षा रक्षक दक्षता पथकाने 260 अवैध वाहनावर कार्यवाही

जिंतूर::परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व एस. टी.महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. नारनवरे मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार रा.प. परभणी विभागांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक प्रतिबंधक विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येत असून या अंतर्गत परभणी विभागाचे विभाग नियंत्रक यांनी परभणी विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक यांना त्यांच्या आगाराच्या अखत्यारीतील बस स्थानकाच्या 200 मीटर नो पार्किंग झोन मध्ये उभे राहून अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच विभागातील दक्षता पथकामार्फत विविध बस स्थानकावर जाऊन बस स्थानकाच्या 200 मीटर नो पार्किंग झोन ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून पोलिसांच्या मदतीने नो पार्किंग झोन मध्ये उभे असलेल्या वाहनांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन दिवसात सदर मोहिमेअंतर्गत पोलिसांच्या मदतीने 260 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून सदर मोहीम पुढील आठवडाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती परभणी विभाग सुरक्षा दक्षता अधिकारी काळबांडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!