पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवसुत्री आव्हान देशहिताचे:: पालकमंत्री मेघना बोर्डीकर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवसूत्री आव्हान देशहिताचेच:पालकमंत्री मेघना बोर्डीकर
जिंतूर::पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मनिर्भर भारतासाठी बचत आणि स्वदेशीचा संदेश देशासमोरील जागतिक आर्थिक आव्हाने, वाढत्या इंधनदरांचा परिणाम आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने देशवासीयांना नवसूत्री आवाहन हे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी केलेले आव्हान देश हिताचेच असल्याचे मत पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केले.
प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात बचत,संयम आणि स्वदेशीचा स्वीकार करावा, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन करताना परकीय चलनाची बचत करण्यावर भर दिला. भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो. त्यामुळे आयात खर्च वाढून अर्थव्यवस्थेवर ताण येतो. नागरिकांनी अनावश्यक सोने खरेदी टाळल्यास देशाचे आर्थिक संतुलन मजबूत राहण्यास मदत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
इंधन बचतीसाठी पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले.शक्य तिथे मेट्रो, बस, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर असे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खाद्यतेलाच्या वाढत्या आयातीचा उल्लेख करताना मोदी यांनी नागरिकांनी तेलाचा संयमित वापर करावा,असे आवाहन केले.देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. नैसर्गिक शेती, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार केल्यास देश अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी “व्होकल फॉर लोकल” या संकल्पनेची पुनरुच्चार करत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. विदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करून भारतीय उद्योगांना पाठबळ दिल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी यांच्या या नवसूत्री आवाहनावर देशभरात चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे. नागरिकांनी दैनंदिन जीवनात छोट्या बदलांचा स्वीकार केल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले नऊ सूत्री आव्हान देशास आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणारे टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले.




