वरुड (नरसिंह) गावचे सुपुत्र अमोल थिटे यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव

वरुड नृसिंह गावचे सुपुत्र अमोल थिटे यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव
जिंतूर:: तालुक्यातील वरुड (नृसिंह) गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख असणारे अमोल सुरेशराव थिटे यांचा कृषी विज्ञान केंद्र परभणी यांच्याकडून दादा लाड कापुस लागवड पद्धतीने कापुस लागवड करून चांगले उत्पादन घेतल्याबद्दल तसेच सेंद्रिय आणि जैविक शेतीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ दादा लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर जीवन ज्योत ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीताई देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक श्री रविराज देशमुख, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ बेग सर,डॉ.अहिरे सर, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर चे डॉ. श्री तायडे सर,डॉ.श्री रामकृष्ण सर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी अमोल थिटे सर यांनी उपस्थित शेतकरी आणि मान्यवर मंडळीसमोर शेतीतील आपले अनुभव आणि उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.तसेच डॉ दादा लाड यांना कापुस पिकांत घन लागवड पद्धत म्हणजेच दादा लाड कापुस लागवड पद्धत संशोधन केल्याबद्दल पद्मश्री मिळाल्याबद्दल दादांचा सत्कार केला यावेळी सोबत बालाजी फरकांडे आपल्या गावातील शेतकरी सह उपस्थित होते.



