Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

जिल्हाधिकारी दालनात प.स.सदस्यांच्या निवडी संपन्न

जिल्हाधिकारी दालनात
प.स.सदस्यांच्या निवडी संपन्न

गटनेते पदी भास्कर ठोंबरे,उप गटनेते पदी सोनाली दराडे तर प्रतोत पदी परमेश्वर ढाकरे यांची वर्णी

जिंतूर:: मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मा.नामदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वात परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिंतुर पंचायत समिती गटनेता निवड प्रक्रिया मा. कलेक्टर साहेबांच्या दालनात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली, ही जिंतुरकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
नवनिर्वाचित गटनेते भास्कर ठोंबरे व उप गटनेते सोनाली दराडे आणी प्रतोत परमेश्वर ढाकरे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

या सर्वांचे जिंतूर तालुक्यात स्वागत होत असून पुढील कार्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडल्याबद्दल मा. कलेक्टर साहेबांचेही मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहे.
तसेच तालुका अध्यक्ष गोविंद थिटे पाटील व सर्व सदस्यांच्या नेतृत्वाखाली जिंतुर पंचायत समितीचा विकास अधिक वेगाने व परिणामकारकपणे केला जाईल अश्या भावना नवनिर्वाचित सर्व पंचायत समिती सदस्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मीनाताई बोर्डीकर यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!