Uncategorized

बंजारा समाजाचा ST प्रवर्गासाठी एल्गार: तीव्र रास्ता रोको आंदोलनाने शहर थांबले

बंजारा समाजाचे आंदोलन पेटले

एसटी प्रवर्गात मागणी साठी बंजारा बांधव आक्रमक

जिंतूर शहरात अचानक चोहो बाजूनी रास्ता रोको,

आंदोलक व प्रशासनात समन्वतेचा अभाव

वाहतूक,एसटी सेवा कोलमडली

ऐन सणासुदीत व्यापारी व ग्राहकांची नागरिकांची धांदल,

जिंतूर:: सध्या जिंतूर शहर विविध मागण्यासाठी आंदोलनाची केंद्र बनले असून या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन कमालीचे धास्तावल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिंतूर शहरात आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन, धनगर समाज तसेच बंजारा समाजाचे आंदोलन सुरू असुन आज बंजारा समाजाचे आंदोलन उग्र स्वरूपात झाल्याचे दिसून आले.
याविषयी सविस्तर माहिती असे की गत आठ दिवसापासून विनोद आडे या तरुणाने बंजारा समाजास एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे या प्रमुख मागणी साठी उपाषण करत आंदोलन छेडले आहे. या उपोषण आंदोलनाची उपोषण कर्त्ये विनोद आडे यांची शुगर व बीपी पातळी चढ उतार होत असल्याने व उपोषणाने त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याची भावना समाज बांधवात निर्माण होत होती. व याची कोणतीही स्थानिक प्रशासन दखल घेत नाही याबाबत समाज बांधवात तीव्र असंतोष खदखदत होता. 12 तारखेला रास्ता रोको आंदोलन आहे असा लेखी इशाराही दिलेला होता. दिलेल्या निवेदनात बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबांना एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एक पात्र व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी बंजारा समाजाला अनुसूची जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण लागू करण्यात यावे अशा प्रसुख मागण्या करण्यात आलेल्या होत्या.
जिंतूर तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वसलेला आहे आजच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजासह महिलांचाही समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला.बंजारा युवक विनोद आडेच्या उपोषण आंदोलनात संबंध बंजारा समाज एकवटल्याचा दिसून आला.
चौकट
बंजारा समाजाने 12 तारखेच्या दिलेल्या शांततामय रस्ता रोको आंदोलनाची दखल स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी गंभीरतेने घेतले नसल्याचे चित्र आज दिसून आले. समाज बांधवांनी शहरातील चोहो बाजूनी ज्यात अण्णाभाऊ साठे चौक, बलसा फाटा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदि सर्व चहुबाजूने रस्ता रोको आंदोलन करून स्थानिक पोलीस प्रशासनाची दमछाक झाल्याचे दिसून आले. ऊपोषणकर्ते आंदोलनाची जागा निश्चित करण्यासाठी स्थानिक तहसीलदार कच्छवे मॅडम व बंजारा बांधव शिष्टमंडळाची बाचाबाची झाल्याचे समजते.कारण पोलीस प्रशासन आंदोलन करण्यासाठी एक जागा निश्चित करत होते तर महसूल महसूल प्रशासन एक जागा निश्चित करत होते या सर्व घडामोडीत आंदोलन करते व स्थानिक प्रशासनात समन्वतेचा आभाव दिसून आला.. यातील दुरी वाढत गेली.. व आज तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे एसटी प्रवासी सेवा अन्य वाहतूक सेवा विस्कळीत झाली. व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले कारण काही ठिकाणी दुकानावर दगडफेक झाल्याचे प्रकारे घडल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!