
अधिकमासात तीर्थक्षेत्रांना भेटी अर्ध्या तिकीटाताच
एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला प्रतिसाद;
जिंतूर : अधिकमासाच्या पवित्र
महिन्यात भाविक मोठ्या संख्येने विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात. भाविकांची ही गर्दी आणि त्यांची सोय लक्षात घेता,राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “एसटी संगे तीर्थाटन’ ही विशेष योजना तीर्थाटन सुरू केली आहे. या योजनेंतर्गत भाविकांना आता अर्ध्या तिकिटात देवदर्शन घडणार असून, एसटीने या कालावधीत विशेष नियोजन केले आहे. या योजनेंतर्गत विविध तीर्थक्षेत्रांना भाविकांना भेटी देणे सोयीचे ठरत आहे.
@सवलतींचा मोठा लाभ@
:::::::::::::::::::::::::::::::::::::::
एसटी प्रशासनाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलती अधिक प्रभावीपणे लागूकेल्या आहेत. यात महिला, मुले आणि ज्येष्ठांना बसच्या तिकिटात
५० टक्के सवलत (अर्धे तिकीट) दिली जात आहे. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेनुसार ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत आहे.
या सवलतींमुळे अधिकमासातील तीर्थयात्रा आता अधिक सुखकर झाली आहे.
@काय आहे ‘एसटी संगे
तीर्थाटन’ योजना@
एसटी महामंडळाने तीर्थयात्रेला
जाणाऱ्या भाविकांसाठी ही योजना सुरू केली आहे. यामध्ये महिला मंडळे, भजनी मंडळे, ज्येष्ठ नागरिकांचे गट, बचतगट किंवा ४० नागरिकांचा समूह एकत्र येऊन एसटी बस बुक करू शकतात. खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास व्हावा, या उद्देशाने ही योजना राबवली जाते. योजनेचा लाभ कसा घ्यावा?
ज्या भाविक गटांना किंवा मंडळांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मागणीनुसार बस उपलब्ध करून देण्याबाबत एसटीचे नियोजन पूर्ण झाले आहे. ४० प्रवासी गट त्यांना हव्या त्या मार्गावर बस उपलब्ध करून दिली जाते.
” अधिकमासात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळ सज्ज आहे.”एसटी संगे तीर्थाटन”योजनेमुळे
भाविकांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास करणे शक्य होणार आहे. ४० नागरिकांचा गट
एकत्र आल्यास स्वतंत्र बसची सोय करून दिल्या जाते. प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन तत्पर असल्याची माहिती आनंद चव्हाण (आगार प्रमुख),स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे,वाहतूक निरीक्षक शरद पाटील आदींनी दिले आहे.
===================
@प्रवाशांच्या गटाला मिळणार गावात बस@
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिंतूर आगाराने तीर्थक्षेत्रांसाठी विशेष वेळापत्रक आखले आहे.
यामध्ये ४० जणांचा गट असल्यास त्यांना हव्या त्या मार्गावर बस उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती स्थानिक महामंडळ प्रशासनाने दिली आहे.




