Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन छेडणार::विजय चोरडिया

पत्रकारांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन तीव्र करणार-विजय चोरडिया
जिंतूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
जिंतूर:- वा
दि 2 राज्यभरात पत्रकारावर होत असलेले विविध हल्ले, पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे यासह पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येत असून शासनाने याची दखल न घेतल्यास राज्यभरामध्ये पत्रकार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा व्हॉइस ऑफ मीडिया चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला
पत्रकारांच्या विविध मागण्याच्या संदर्भात दि 2 एप्रिल गुरुवार रोजी तहसील ऑफिस जिंतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर ठीक ठिकाणी हल्ले होत आहेत. शिवाय खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत .पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात येत नाही. याशिवाय राज्यस्तरावरील विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना चोरडिया म्हणाले की राज्य शासन लहान वर्तमानपत्राची गळचेपी करत असून त्यांना मिळणाऱ्या जाहिरातीची संख्या अत्यंत अपुरी आहे. शिवाय जाहिरातीचा दर अत्यंत कमी असून इतर दैनिकांच्या तुलनेने त्यांना मिळत असलेल्या जाहिराती या आकाराने छोटे आहेत . लहान वर्तमानपत्रांना जिल्हा स्तरावर देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा भेदभाव करण्यात येत आहे. या व पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती कार्ड हे ग्रामीण पत्रकारांना देण्यात यावे. त्या संदर्भात असलेल्या अटी शिथिल करण्यात याव्या. पत्रकारांना मिळणाऱ्या पेन्शनच्या संदर्भामध्ये जाचक अटी शासनाने रद्द करावे. या व इतर मागण्यांसाठी राज्यभर तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल घेणे अत्यंत गरजेचे असून शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभर या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्हॉइस ऑफ मीडिया चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिला.
जिंतूर येथे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत राखे यांना पत्रकारांच्या विविध मागण्याची निवेदन देण्यात आले . या मागण्या शासन स्तरावर पाठवण्याची विनंती त्यांना करण्यात आली यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा मार्गदर्शक राजाभाऊ नगरकर, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख , सचिन रायपत्रीवार, गुलाबराव शिंदे, नागनाथ दाभाडे, अरविंद तरटे, संदीप माहूरकर, शंकर देशमुख, (देशमुख), रामकिसन ठोंबरे, काशिनाथ घुगे, अशोकराव उकंडे, चंद्रकांत गवळी, विनोद पाचपिल्ले, देवकर दिलीप, आबासाहेब जाधव, राम रेघाटे, तायडे एस. एस., प्रभाकर कुऱ्हे, रंगनाथ गडदे, किशन खाडे, यादव मस्के, पंकज चव्हाण, राजू गारकर, , रामा ढाकरगे, पद्माकर कौसडीकर, तुकाराम सर्जे, नेमिनाथ जैन, मुंजा कंठाळे, संतोष लहाने आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!