Uncategorized

गणपुरच्या सरपंचास अंधारात ठेवून एक कोटी वीस लाखाचा फंड केला परस्पर वर्ग

गणपुरच्या सरपंचास अंधारात ठेवून एक कोटी वीस लाखाचा फंड परस्पर वर्ग

@परस्पर संस्थेकडे लंपास केलेल्या फंडाची तक्रार आयुक्त,सीईओ, गटविकास अधिकारी यांच्या कडे दाखल

@मागासवर्गीय सरपंचाच्या तक्रारी कडे दुर्लक्ष: पंचायत समिती पुढे आदोलनाचा इशारा

जिंतूर:गणपुर या गावांमध्ये आमदार फंड 60 लाख रुपये व इतर फंड साठ लाख रुपये अशा विविध कामासाठी फंड मंजूर करण्यात आला होता.हे सर्व काम ग्रामपंचायत करण्यासाठी सक्षम होती पण ग्रामपंचायत वर काम केल्यावर ते चांगले करावे लागतील या भावनेने गुत्तेदारांनी व कार्यकर्त्यांनी सरपंच यांच्या अनेक कागदावर नकली सह्या करून हे फंड संस्थेकडे वळवला आहे काही कामे करून थंड उचलूनही घेतला आहे पण सरपंचाला कळताच सरपंचांनी अनेक वेळा तक्रारी दिल्या व काही कामे आता चालू आहेत अनेक वेळा तक्रारी देऊनही त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली व इंजिनीयर देशमुख यांनाही या कामाची माहिती दिली होती पण त्यांनी 20 टक्के कमिशन घेऊन पूर्ण बिल लिहून दिले त्यामुळे दोन वर्ष झाले सरपंच तक्रारी देत आहे पण त्यांच्या तक्रारीची कोणी च दखल घेतली नाही बिडिओ.सीऔ.व आयुक्त कार्यालय संभाजीनगर बांधकाम विभाग या सर्व कार्यालयामध्ये तक्रारी दिल्या पण सरपंचाची तक्रारीची दखल न घेतल्यामुळे सरपंचांनी अमर उपोषण करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मी मागासवर्गीय असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सईचा अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला आहे. त्यामुळे संबंधितांवर 420 चा गुन्हा दाखल करून या सर्व कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करावी नाहीतर मी पंचायत समिती समोर मोठा आंदोलन उभारणार आहे. असा इशारा सरपंच अनिल भगवान लांडगे व सदस्या सुमन काष्टे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!