मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते जि.प.अध्यक्षाचा सत्कार

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी जि.प. अध्यक्षा वाकळे यांचा सत्कार*
जिंतूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन करत सत्ता स्थापन केली आहे राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशाची दखल घेत मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई विजय वाकळे यांचा विधान भवन मुंबई येथे सत्कार करून गौरव केला.
परभणी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भाजपने जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिली आहे तसेच परभणी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका तसेच पंचायत समित्यांमध्ये घवघवीत यशाबद्दल भाजपा चा झेंडा फडकावला आहे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे तब्बल २४ सदस्य विजयी झाले आणि महायूतीची सत्ता आली आहे. आणि यामध्ये लताताई विजय वाकळे यांची जि.प. अध्यक्षपदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाचे श्रीकांत भोसले विटेकर यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अध्यक्षा यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्याचे आवाहन केले. विशेषतः पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी भाजप जेष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,गट नेते दिलीपराव देशमुख,सुनिल भोंबे पाटील,सुमेध सूर्यवंशी,संजय वाकळे उपस्थित होते.




