Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

जिंतूर एसटी आगारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न:: लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन केले जाईल::प्रभारी आगार व्यवस्थापक गिलचे

जिंतूर एसटी आगारात संपन्न झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

जिंतूर आगारात एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण उत्साहात
जिंतूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिंतूर आगारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आगार परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
या वेळी नगर अध्यक्ष प्रताप देशमुख,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन गोरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल महिपाल, खेत्रे आबा,प्रभारी आगार व्यवस्थापक गिलचे,आगार लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळ,वरिष्ठ लिपिक प्रल्हाद मुंडे,कमलाकर कनकुटे,गजानन घुगे,गजानन गीते,राहुल लिखे,संदीप भांबळे,मदन मुंढे,कल्याण देशमुख,मन्नान जाधव,लिपिक गजानन घुगे,गुणीरत्न वाकोडे, वाहक कैलास मोरे,शिपाई शेख बिलाल, स्वच्छता सुपरवायझर चव्हाण,लाटेताई, सहाय्यक इब्राहिम खान,आगारातील अधिकारी,कर्मचारी तसेच विविध विभागातील आगार कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
एसटीच्या ७८ वर्षांच्या सेवाप्रवासाचा गौरव करताना प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.
कार्यक्रमानंतर लावण्यात आलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला. जिंतूर आगाराने सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्याबद्दल या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

@चौकट@
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा वृक्षारोपण कार्यक्रम जिंतूर आगाराच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा आणि पर्यावरण संरक्षणाच्या बांधिलकीचा एक सकारात्मक उपक्रम ठरला असून आज संपन्न झालेल्या वृक्षारोपण केलेल्या रोपाचं चांगल्या प्रकारे संगोपन केले जाईल असे स्पष्टीकरण जिंतूर आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक गिलचे यांनी आपले मत या वेळी व्यक्त केले.. व संपन्न झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!