Welcome to Konark Gatiman Media   Click to listen highlighted text! Welcome to Konark Gatiman Media
Uncategorized

तुकाराम मुंढेची नवीन पालक सचिव म्हणून एन्ट्री

तुकाराम मुंढे कडक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती

परभणी जिल्ह्यास तुकाराम मुंढे नवीन पालक सचिव

तुकाराम मुंढे यांची कडक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती

जिंतूर: महाराष्ट्र शासनच्या सामान्य प्रशासन विभागाने विविध जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या नियुक्त्यांबाबत आदेश जारी केले आहेत. मंत्रालय, मुंबई येथून २३ फेब्रुवारी रोजी हा शासन आदेश काढण्यात आला.
या आदेशानुसार परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी श्री. तुकाराम मुंढे (सचिव, दिव्यांग कल्याण विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी श्री. दीपक कपूर (अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग) यांच्याकडे होती.
प्रशासकीय कारणास्तव राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालक सचिवांमध्ये बदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले पालक सचिव लवकरच कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आपल्या परभणी जिल्ह्यात नवीन पालक सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची इंट्री झाल्याने साहजिकच जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रेवर जरब राहून लाल फितीचा कारभार पळायला लागणार असे दिसून येत आहे तुकाराम मुंढे हे (सचिव-दिव्यांग कल्याण विभाग) हा पाहणार असून

सहाजीकच परभणी जिल्ह्यातील असंख्य बोगस सवलती धारक अपंगावर गदा येणार असल्याचे दिसून येत आहे. यात मग सवलतीचा प्रवास करणारे असतील किंवा शासकीय निमशासकीय बोगस अपंग लाभार्थी असतील अशांची परभणी जिल्ह्यात नक्कीच तारांबळ होणार असे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!